शुक्रवार, ८ जानेवारी, २०१०

दिल चाहता है..कभी ना बीते चमकीले दिन...

दिल चाहता है..कभी ना बीते चमकीले दिन...
दिल चाहता है.. हम ना रहे कभी यारों के बिन.....

पण नुसतं दिल चाहुन काय उपयोग...प्रत्यक्षात खरंतर सगळेजण नोकरी,संसार,दगदग्,धावपळ या सगळया चक्रात इतके अडकले आहेत ना की साधं फोन आला तरी बोलणं शक्य होत नाहीये...
आता याच आठवड्यातलं बघा ना....मीनल आणि विक्रांत दोघांचेही फोन वाजत होते आणि माझ्या डेस्काशेजारी माझा डोकं पिकवत बसलेल्या कोणामुळे तरी मला त्यांचे फोन उचलता आलेच नाहीत.. :-(आणि मग सगळ्या गोंधळात मी विसरुनच गेले त्यांना कॉलबॅक करायला...

आणि सगळ्यात वाईट म्हणजे दुसर्‍या दिवशी त्यांना न विसरता फोन केला तर एकाने कट केला (डेस्क पाशी बसुन डोकं पिकवणारी माणसे सगळ्या कंपन्यांमधे असतात...) आणि दुसर्‍याचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर.. :-(

त्याक्षणी वाटलं..काय हे आयुष्य.....एक काळ होता की आम्ही सगळे सतत एकमेकांसोबत असायचो आणि तरीसुद्धा बोलणं संपायचं नाही....आणि आता १-२ आठवडे आपण एकमेकांशी फोनवरुन सुद्धा बोलु शकत नाही....त्यावेळी पी एल्स मधे घरी गेलं तरी मोबाईलचं बील परवडायचं नाही म्हणुन मोठमोठाले मेसेजेस पाठवायचो एकमेकांना...आणि आता इथे ऑफिसमद्धे फुकटात फोन असुनही बोलु शकत नाहीये मनसोक्त.....

का गुंतवुन घेतलंय मी इतकं स्वतःला....काय निसटत चाललय हातातुन्....या सगळ्याच शोध घेण्यासाठी हा ब्लॉग...माझ्या कॉलेजजीवनातल्या सगळ्या आठवणींना मागे बोलवायचय..सगळे क्षण परत जगायचेत आणि इथे बंदिस्त करुन ठेवायचंय...

ती धमाल...ती मस्ती..ती भांडणं...ते पावसाळी ट्रेक्स्....त्या खादाड्या...त्या परीक्षा...गदरिंग....रात्र रात्र जागवुन केलेला अभ्यास...वाढदिवस......सगळं सगळं....

आता देव करो आणि मला या ब्लॉगमद्धे भरपुर काही लिहायला खुप खुप वेळ मिळो..

३ टिप्पण्या:

  1. तुझ्या ह्या नव्या ब्लॉगवर पहिली पोस्ट माझीच बरं का.. :) लक्ष्यात आहे का मी कोण ते... :)

    तुझा हा ब्लॉग शोधावा लागला... :) मनात आहे त्याप्रमाणे खुप-खुप लिही... पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत ... :)

    उत्तर द्याहटवा
  2. @रोहन... खुप खुप आभारी आहे ....मी प्रयत्न करत राहीन भरपूर लिहायचा...
    आणि हो...तु माझ्या पक्का लक्षात आहेस्...
    तुझ्या सगळ्या ब्लॉग्स वरच्या सगळ्या पोस्ट्स मी वाचते आहे.....पण प्रतिक्रिया द्यायला जमंत नाहीये... त्यामुळे माफ कर... :-(

    उत्तर द्याहटवा
  3. hey smita
    Nice Article

    Same case for me also
    I was in cummins. 2008 batch passout.
    i got placed in syntel on 18th july 2007
    in my group also everyone was placed except 2 girls :) that day also me and my friend minal(friend name also same) waiting for result ....Senapti Bapat road.
    kay feelings hotya tya divshi......tuza article vachun mala sagla athavla ..mazi same condition hoti..
    pan recession mule amala joining nai milale....feb 2010 madhe me join zale syntel madhe..... tu nai disat ahe syntel madhe...sodlis ki join nai kelis....
    Anyways .......Nice article.............

    उत्तर द्याहटवा