सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

एका नोकरीची कथा

कालच "थ्री ईडियटस" पाहीला....आता हे वाक्य वाचुन मी चित्रपटाचं कौतुक वगैरे करणार आहे असा गैरसमज करुन घेउ नका...म्हणजे चित्रपट अप्रतिमच आहे...सगळ्यानी बघितला आहे...आणि बर्‍याच जणांनी त्याबद्द्दल बरंच काही लिहिलेलं आहे....त्यामुळे चित्रपटाविषयी काही लिहायला हा लेख नाही...त्या चित्रपटात एक सीन आहे...शर्मन जोशी चा इंटरव्यु चालु आसतो आणि आमीर खान अत्यंत रेस्टलेस होउन बाहेर बसलाय रीझल्ट ची वाट पहात...

माणसाची जनरली अशी टेन्डन्सी असते की एखादा चित्रपट पाहताना आपण त्यातले प्रसंग स्वतः शी रिलेट करुन पाहात असतो...आणि बर्‍याचदा हे प्रसंग आपल्या आयुष्याशी मिळतेजुळते असतात्...वरचा प्रसंग पण असाच माझ्या आयुष्यात येउन गेलाय्...तिथे शर्मन च्या जागी मी होते..आणि अस्वस्थपणे केबीनबाहेर माझी वाट बघणारे होते माझे दोस्त...मीनल आणि विक्रांत..

थर्ड ईयर सुरु झालं आणि कँपस ईंटरव्यु ची हवा सगळीकडे पसरली...यावर्षी किती कंपनीज येणार्,कधी येणार याच्या चर्चा सुरु झाल्या.शकुंतलादेवी,आर्.एस्.अगरवाल यांची देवाणघेवाण सगळीकडे सुरु झाली...पोरांनी आपापल्या आत्तापर्यंतच्या सेमिस्टरचे अ‍ॅव्हरेज मार्क्स काढायला सुरुवात केली...आणि अचानक माझ्या लक्षात एक गोष्ट आली...की ५ व्या सेम मधे अचानक पणे फस्ट क्लास वरुन सेकंड क्लास वर घसरलेले माझे मार्क्स मला दगा देणार आहेत आणि माझं अ‍ॅव्हरेज त्यामुळे खुप खाली जातंय.... :-(

आता आली का पंचाईत....आता निम्म्या पेक्षा जास्ती कंपनीज च्या एन्ट्रन्स क्रायटेरीयात सुद्धा मी बसत नाही हे वास्तव मला उमगलं...आणि कँम्पस जॉब मिळणार की नाही अशी टांगती तलवार सतत डोक्यावर लटकलेली असायची...

परीक्षा संपल्या आणि कँपस ईंटरव्यु सुरु झाले...मी बर्‍याचश्या कंपनीच्या क्रायटेरीयामद्धे फिट नव्हते...त्यामुळे लेखी परीक्षेत बसायची सुद्धा परवानगी नव्हती...आणि ज्या काही थोड्याफार कंपनीच्या लेखी परीक्षा दिल्या त्यासुद्धा पास करु नाही शकले...मग पुढे ईंटरव्यु चा संबंध च संपला...
अमिताने पहिल्याच कंपनीत ईन्फी मधे जॉब मिळवुन आमच्या ग्रुप चा श्रीगणेशा केला.लगेच दुसर्‍या दिवशी मिनल ने विप्रो मद्धे आणि तिसर्‍या दिवशी विक्रांतने टीसीएस मद्दे झेंडा रोवला....झालं आख्खा ग्रुप प्लेस झाला तरी आमचं गाडं आहे तिथंच....मगतरं काय..अजुनीच जस्ती टेन्शन आलं...
होता होता सुमारे १ महिना उलटला...बर्याच कंपनीज येउन गेल्या..अजुनही बर्याच येत होत्या...मिनलं आणि विक्रांत मला सतत धीर देत होते..काळजी न करण्यासाठी सुचवत होते...इतकचं काय पण अमिता,मिनल आणि विक्रांत कोणीही अजुन जॉब मिळाल्याबद्दल अजुन सेलीब्रेट नव्हतं केलं...माझ्यासाठी थांबले होते ते...सोबतच जॉब ची पार्टी करायची म्हणुन....

अखेर एक दिवस...सिंटेल नावाची एक कंपनी कॅम्पस साठी आली....लेखी परीक्षा होती भारती वीद्यापीठ,कात्रज ला...एम.आय्.टी ,एम आय टी वुमन्स,एम आय टी चे एम बी ए चे स्टुडं ट्स आणि त्यात भर म्हणुन भारती वाले...अशी चिक्कार पब्लीक होती परीक्षेला...इतक्या गर्दीत काय आपल्या निभाव लागणार असं एक क्षण मनात आलं...पण मग इथेच करुन दाखवायचंच आज असं अचनक ..विक्रांतच्या भाषेत "पेटलेच" मी एकदम...लेखी परीक्षा झाली आणि पुढचे ३ तास मला अस्वस्थता म्हणजे काय असते हे पुरेपुर कळलं...

अखेर लेखी परीक्षेत पास झालेले आणि इंटरव्यु साठी सीलेक्ट झालेल्यांची नावे जाहीर झाली आणि त्यात माझं नाव ऐकुन जीव भांड्यात पडला...चला अर्धं काम तर झालं..आता मुख्य लढाई...
तिथुन मग सिंटेल च्या ऑफिसमद्धे जाउन इंटरव्यु दिला ईतकच आठवतयं :-)....अधलेमधले डीटेल्स काहीच लक्षात नाहीत....आणि त्या दुष्टांनी सुद्धा रीझल्ट लगेच सांगायचा की नाही....उगीच लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार्..पण नव्हे...इतका सोपा नव्हतं हे....रीझल्ट २ दिवसांनी तुमच्या कॉलेजच्या रीक्रुटमेंट हेड ला कळवला जाईल असं सांगुन सिंटेलवाल्यानी टाटा केलं..
आता परत २ दिवसाची अस्वस्थता.. हे तिघे मला सतत सांगत होते की काळजी करु नकोस...आता विचार करुन काय होणारे का...जे व्हायचं ते झालंय वगैरे वगैरे...

अखेर तो दिवस उजाडला.... सुब्रमण्यम सर्..आमचे रीक्रुटमेंट ऑफिसर्....त्यांच्या ऑफिसबाहेर आम्ही बसलो होतो...आम्ही म्हणजे...आम्ही इंटरव्यु दिलेले लोकं आणि माझ्यासोबत होते मिनल आणि विक्रांत....माझ्यापेक्षा मला त्यांच्याच चेहेर्‍यावर जास्त काळजी,उत्सुकता असं सगळं मिश्रण दिसत होतं....अखेर सरांनी आत बोलवलं आम्हाला...मला माझे हार्ट बीट्स स्पष्ट ऐकु येत होते....सुमारे ५ मिनिटांचं मोठं भाषण दिल्यावर त्यांनी पहिलं नाव घेतलं...."स्मिता कुलकर्णी...Congratulations..."...पुढे काय बोलले काही माहीती नाही...त्यांच्या हातातलं लेटर घेउन मी बाहेर आले....एकदा मनात आलं...की रडवेला चेहेरा करुन जरा थाप मारावी आणि मिनल्-विक्रांत ची मज्जा करावी....

पण त्या दोघांना पाहिलं आणि सगळं विसरले...धावत जाउन मिनलच्या गळ्यात पडले...हे दोघे बहाद्दर केबीनशेजारच्या जिन्यात उभे राहुन,सरांच्या केबीनच्या खिडकीतुन आतुन पहायचा प्रयत्न करत होते....मला म्हणतात कसे...सरांनी अभिनंदना साठी हात पुढे केलेला दिसत होता..पण दुसरा हात कोणाचा होता हे दिसत नव्हतं.. आता काय म्हणावं या दोघांना....तसेच पटकन अमिताला फोन केला...काम फत्ते...:-)

आई शप्पथ्थ तो दिवस कधीही विसरणार नाही.... माझ्या मित्रांचे चिंतातूर चेहेरे....आणि मला लेटेर सकट केबीनबाहेर येताना बघुन त्यांनी आनंदाने केलेला आरडाओरडा....सगळ सगळ अगदी काल घडल्यासारखं वाटतय अजुनही....

मी खरतर मला कँपस जॉब मिळेल अशी आशा सोडुन दिली होती..पण माझ्या मित्रांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तो सार्थ करण्याची शक्ती मला दिली..
A friend is one who believes in you when you have ceased to believe in yourself

त्यानंतर आम्ही धमाल पार्टी केली हे वेगळं सांगायला नकोच :-)

हा जॉब जगातला सर्वोत्तम जॉब होता आणि तो मिळणं अतिमहत्वाचं होतं अशातला भाग नाही...माझ्या मित्रांच्या विश्वासाला आणि प्रेमाला मी पात्र ठरले हा फार मोठा आनंद त्या दिवशी मला या ऑफर लेटर ने दिला. :-)