मिनल आणि विक्रांतचे नेहेमीचे घोळ काही संपेनात...(कॉलेजपासुनचीच सवय....रात्री १० वाजता जमुन ठरवायचं की आज जेवायला कुठे जायचं ते...मग होटेलमधे पोचायला ११...मग तो वेटर म्हणणार्..."सब ऑर्डर एकसात दो...किचन बन्द होगा ११ बजे"....मग त्याला सगळी ऑर्डर देउन निवांत गप्पा टाकत बसणार आम्ही...अखेर शेवटी ते सगळे वेटर्स होटेल ची आवराआवरी करायला सुरु करायचे....कुठे खुर्च्या सरकव...कुठे त्या टेबलक्लॉथच्या घाड्याच घाल्....थोडक्यात जावा आता घरी..उरलेल्या गप्पा घरी जाउन मारा असा भाव असे त्यांच्या चेहेर्यावर...)
प्रदीर्घ अनुभव लक्षात घेउन अखेर मी एका मेल मधुन घोषित करुन टाकलं की आपण सगळे शनिवारी सकाळी ११ वाजता "ब्रंच" साठी (म्हणजे निदान वेळेत लंच ला तरी पोचु अशा दूरदृष्टीने ब्रंच जाहीर केला :-)) चांदनी चौकात भेटायचय्....मग कुठे जायचं ते पाहु....
आणि मग सगळेजण "वेळेत" म्हणजे १२:३० ला भेटलो ..चांदनी चौकात नव्हे..एफ्.सी वर्...(एमेल्स कमी पडले की काय म्हणुन मग फोन वर परत वे़ळ आणि ठिकाणे बदलली )अखेर आमच्या वॅगन्-आर मधुन आम्ही सहा जण(मिनल-अजय्,जुई-विक्रांत, श्री आणि मी) निघालो....मिशन होतं ..."बार्बेक्यु नेशन्स,कल्याणीनगर"...
विक्रांतने फ्रंट सीट वर बसुन "मला सगळा रस्ता माहीती आहे" असा आव आणला आणि अखेर चुकीच्या जागी नेउन आम्हाला नेहेमीप्रमानेच गंडवलं....अखेर चुकतं माकतं..एकदाचे होटेल मद्धे पोचलो तेव्हा १:३० वाजला होता...
पण आत पाय टाकुन बुफे लावलेल्या टेबल कडे नजर गेली तेव्हा सगळेच खुष झालो...अखेर स्थानापन्न होउन सगळे पुढच्या कामाला लागले...खादाडी आणि गप्पा :-)
गोडच गोड...
खुप सार्या व्हरायटीज होत्या मेन कोर्स मद्धे पण
एकामागुन एक चिकन्,मटन्,पनीर्,मिक्स व्हेज असे कबाब यायला लागले आणि बडबड बंद होउन सगळे पेटपूजे कडे वळले...झक्कस पैकी कबाब खाता खाता अजुन मेन कोर्स आणि महत्वाचं म्हणजे डेझर्टस आहेत हे कोणीही विसरले नव्हते...तिथल्या खाण्याबद्दल जास्त "बोलण्यासारखं" नाही.."बघण्यासारखं" आहे...
माझं जेवण्...मी स्टार्टर्स नंतर लगेच गोडाकडेच वळले....:-)
किवी चीज केक..
जेवण करुन पोट भरलं तरी गप्पा मरुन मन भरलं नव्हतं....त्यात आता विक्रांत कमीतकमी १ वर्ष तरी भेटणार नव्हता...एकाच गावात असुनही तसं १-२ महिन्यातुन एकदाच भेटणं होतं आमचं सगळ्यांचं..पण मनात कुठेतरी एक असं असतं की अरे हे दोघे पुण्यातच आहेत...ज्या क्षणी ईच्छा होईल तेव्हा १/२ तासाच्या आत त्यांच्या घरी जाउन धडकता येईल..पण हे अमेरीका वगैरे फारच लांब आहे बुवा...पण असो....१ वर्ष काय पटकन जाईल तोवर ईमेल्स,चॅट्,फोन वर भेटुच की.... :-)
विक्रांत आणि जुई ,ही पोस्ट खास तुमच्यासाठी....तुम्ही तिथे जाउन पोचलात की तुम्हाला ही पोस्ट वाचुन परत एकदा आपल्या भेटीचा आनंद मिळेल....(हा पण पदार्थांचे फक्त फोटोच पाहा बरका...हे सगळं तुम्हाला आता मिळणार नाहिये तिथे :-)..)
MIT चे Soldiers :-D
आम्ही आमच्या अर्धांगासोबत..
आम्हा सर्वांकडुन तुम्हाला "Bon Voyage
heyyyyyyyy...wat an excellent blog there Smita !!! Truely these moments will be cherished over the entire lifetime...khuuupach sahi lihile ahes..ase ekdum pratyek kshan tya divashicha parat experience kela..
उत्तर द्याहटवा:)
waah asech lihit raha... ani share karat raha....Happy writing... Vky
ही खाददीची पोस्ट कशी सुटली माझ्या हातून ??? मज्जा केलीत ना.. मी सुद्धा प्लान करतोय आता barbeque ला जायचा फ्रेंड्स बरोबर..
उत्तर द्याहटवा